Skip to main content
पालकत्वाचा आयाम खूप मोठा आहे …
आपण करत असलेलं आपल्या मुलांचं पेरेंटिंग या पुरतंच ते मर्यादीत नसून ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं. समाजाचा एक जबाबदार नागरीक म्हणून “सामाजिक” पालकत्व किंवा social parenting ही खूप महत्वाची संकल्पना देखील ‘सुजाण पालकत्वाच्या ‘ व्याख्येतच येते !!!
अशा प्रकारच्या पालकत्वामध्ये जसं समाजातल्या विविध स्तरांतल्या मुलांचं पालकत्व येतं तसंच अर्थात वृद्धांचं पालकत्व हा देखील अतिशय महत्वाचा विषय येतो. याच प्रकारचं ‘सामाजिक पालकत्व’ गेली ७ वर्ष अतिशय मनापासून आणि प्रचंड मेहनतीने निभावत असलेल्या “तपस” या संस्थेबद्दल आणि तिथे होत असलेल्या उत्तम कामाविषयी जाणून घेणार आहोत … active aging च नाही तर dementia , Alzheimer , palliative care यासारख्या गुंतागुंतीच्या आजरांसाठीही सेवा देणारं आणि आजीआजोबांची उत्तम काळजी घेत त्यांची second inning सुखकर होण्यासाठी सतत नवनवे उपक्रम राबवणारं ‘तपस ‘ नेमकं कसं आणि काय काम करतं? याविषयीचा प्रवास उलगडणार आहोत; या संस्थेची संस्थापक प्राजक्ता ताई अर्थात प्राजक्ता वढावकर हिच्याकडून !!!