Skip to main content

दैन्य जीवाचे

किती तरी सुंदर आणि अतिशय मोहक
कलासक्त मनाची गृहिणी होती ती एक

ईश्वराने कृपा केली प्रसन्न होऊन तिच्यावर
किती गुण दिले तिला आयुष्यात आजवर

देखणे रुप होते तिचे, आणि होती बुद्धिमान
आवडती होती साऱ्यांची, घरी दारी तिला मान

उच्च विद्या विभूषित झाली, नोकरी केली मानाची
घर संसार सांभाळताना घालमेल झाली जिवाची

संगीताची आराधना किती तिच्या आवडीची
गाणं गातानां तर ती स्वत:लाच विसरायची

कविता लिहायची किती तरी होऊन त्यातच धुंद
काव्यलेखन हा होता तिचा आवडीचा छंद

मुलं बाळं घरांत होती दिवस होते सौख्याचे
कळले नाही कधी फिरले फासे तिच्या नशिबाचे

बघतां बघतां घेरुन टाकले स्मृतीभ्रंशाने तिला
उदासीन झाले चैतन्य, उत्साह पार गेला

विकलांगता आणि परावलंबित्वाने घेतला ताबा जीवाचा
नाश झाला पार तिच्या जगण्याच्या इच्छेचा

गाणं गेलं हरवून, अन् कविता गेली विसरुन
बुद्धी आणि मन जेव्हां गेले साथ सोडून

पाहवत नाही ही अवस्था, जीवाचे ते दैन्य
जिवंतपणी मरण भोगणे, करे मना सुन्न

प्रार्थना करीते इतुकी देवा नको कांहीं अन्य
नको देऊ देवा कोणा, हरवू त्याचे चैतन्य !

 

मंदाकिनी क्षेत्रमाडे
२३.९.२०२२

Leave a Reply