Tapas Elder Care,
Arwind enclave,
Sai chowk,
Balewadi ,
Pune .
पोहचलो तेव्हा वातावरण अगदी मंगलमय..
रांगोळी ने सजलेले..
प्रशस्त आवार व हळूहळू येत असणारे ज्येष्ठ.. सोबत नातलग किंवा मित्र परिवार.. सारे कसे देखणे व उत्साही .. ऊर्जा देणारे ..
‘तपस’ संस्था ही *प्राजक्ता वढावकर या सेवव्रती तरूणीने अत्यंत जाणीवपूर्वक ज्येष्ठांसाठी जोपासलेले जिव्हाळ्याचे रोप आहे… त्या रोपाची निगा ती तिचे कुटुंब तिचा संघ अत्यंत काळजीने तन्मयतेने राखत आहे*.. *त्यामुळे तपस संस्था ही ज्येष्ठांसाठी आधुनिक काळातील आनंदाश्रम आहे जिथे नातेवाईक काही अडचणीमुळे अत्यंत विश्वासाने आपले ज्येष्ठ सोपवू शकतात*..
तपस
ज्येष्ठांसाठी निवास
आत्मीयतेने देखरेख ,देखभाल ..
विस्मरणाच्या शिकार झालेल्यांना आपुलकीची जवळीक व आधाराचा हात
तज्ज्ञांकडून तब्येतीचा ताळेबंद..
“तपस” ..
एकाकी होत चाललेल्या ज्येष्ठांचं हक्काचं घर ..
थोरलेपणा हा सणासारखा साजरा करून अर्थपूर्ण जगण्याचा हक्क सुरक्षित करणारे “तपस”..
आणि त्याला एक सुंदर निसर्गरम्य वातावरणात आकार देणारी प्राजक्ता वढावकर..
ज्येष्ठांना इथे टाकल्याची भावना जी वृद्धाश्रम शब्दात अनुस्यूत आहे ती अजिबात स्पर्श सुद्धा करू शकत नाही .. तपस त्यांचं हक्काचं घर वाटते
‘तपस’ …
जिथे ज्येष्ठ एक एक दिवस निरूपायाने मना विरूद्ध ढकलत नाहीत तर एक एक क्षण सण समजून जगतात व नव्या उमेदीने ताजेतवाने होतात…
सेवाभावी तरूण तरूणी विचारपूस करत होते..आलेल्याचा पाहुणचार केला जात होता .. तोंडात टाकताच विरघळणारी करंजी कैरीची डाळ कोकम पन्हे हे अत्यंत रूचकर झालेले होते.. (सुगरणेश्वरी ही उपाधी प्रफुल्ला ला त्यांच्या दिवंगत बंधुराजांनी .. बाबांनी अर्थात अनिल अवचटांनी दिलेली).. प्रत्येक स्नेहमेळाव्यात माझ्या प्रमाणेच अनेक ज्येष्ठ सहभागी होते त्यात मला लता हमीद , दीपा श्रीराम यांचे पण दर्शन झाले … फेसबुक मित्र प्रदीप खरे पण प्रत्यक्षात भेटले..
साठे बिस्किट चे मालक जे आत्ता ९४ वर्षाचे आहेत ते सुध्दा तपस संस्थेबाबत एकाच वेळी कुतूहल व कौतूक करत होते..
बोलता बोलता ते मला म्हणाले की आर्किटेक्चर संस्थेने आता इमारत बांधताना बाथरूम तसेच काॅरिडर मध्ये भिंती लगत भक्कम बार बसवून घेतले पाहिजेत कारण जवळपास ८०/९० टक्के ज्येष्ठांचे छोटे मोठे अपघात इथेच चटकन आधार हाताला न सापडल्याने होतात .. तपस चा स्नेहमेळावा एक नवी दृष्टी मला देऊन गेला..
*प्रफुल्ला*.. *प्राजक्ताच्या आईच्या डोळ्यात लेकीचे व नातींचे*.. *प्राजक्ताच्या मुलींचे अपार कौतुक होते*..ज्या अत्यंत सहजतेने येणारे जाणारे ज्येष्ठांना हवे नको पहात होत्या.. प्राजक्ताची अचिवमेंट.. कामाविषयाची आत्मीयता ,झोकून काम करण्याची सेवा वृत्ती या बाबत प्रफुल्ला चेे मातृहृदय आनंदाने ओसंडलेले मी पहात होते .. प्रफुल्ला चे भाचे मंडळी त्यांची तिथे उपचार घेत असलेली बहीण यांच्या मुळे अधिकच घरचा झाल्याचे फील आले..
*या निमित्ताने प्राजक्ता चे एका शब्दात कौतुक करेन की ती आई प्रफुल्ला च्या एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे*.. .
*तपस’ हे ज्येष्ठांसाठी त्यांचेच एक घर झाले आहे* *त्यांची काळजी घेणारे! त्यांचा सन्मान राखणारे!! त्यांचे मन जपणारे* !!!
निघताना प्राजक्ता ने तपस परिवाराकडून एक तुळशीचे रोप दिले .. एक छान फॅमिली फोटो झाला व मनात आनंदाचे क्षण उजळवित माझी पावले बस स्थानकाकडे वळली
@ शब्दांकन व उपस्थिती
सुरेश सोपानराव कालेकर..