ज्या प्रेमाने, मायेने, आपुलकीने व आत्मीयतेने प्राजक्ता ताई व पूर्ण तपस चा संघ माझ्या आईची व इतर सर्व आजी आजोबांची काळजी घेत आहेत ते कौतुकास्पद आहे. सर्व सणवार अगदी घरापेक्षाही छान साजरे केले जातात इथे. रोज वेगवेगळे क्रियाकलाप, प्रार्थना व आगळे वेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा चालू असतात. वेळच्यावेळी सात्विक खाणे पिणे, चहा पाणी, औषध उपचार, डॉक्टरांची तपासणी व या सगळ्याचे न चुकता येणारे फोटो पाहून आईची आता अजिबात काळजी वाटत नाही मला. स्वतःच्या आजी आजोबांसारखी काळजी घेणाऱ्या तपस च्या तरुण चमूचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा